प्रचंड गर्दीच्या डोंबिवली रेल्वे स्थानकावरव महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०९ – मध्य रेल्वेने बुधवारी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल सोडण्याचा निर्णय घेतल्याने अगोदरच गर्दीचे सर्वात जास्त स्टेशन म्हणून प्रिसध्द असलेल्या डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. प्रंचड गर्दीमुळे नागरिकांना लोकलमध्ये चढणे व उतरणे अवघड झाले होते. अशातच एक महिला प्रसूतीसाठी खडवली रेल्वे स्थानकावरुन कामा रुग्णालयात जात असताना तीला पोटात कळा मारु लागल्या अधिक वेदना होत असल्याने अखेर त्या महिलेला डोंबिवली रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. तीला इतक्या गर्दीतही रेल्वे फलाटावर प्रसूती करण्याचा निर्णय रेल्वे पोलीसांनी घेतला व त्या महिलेभोवती आडोसा करण्यात आला.

तिथेच ती बाळत झाली व तिला मुलगा झाला बाळ बाळतीण दोधांना पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल करण्यात आले. आता बाळ व बाळतीण सुरखरुप आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले की जसमीन शब्बीर शेख (२९) असे त्या महिलेचे नाव असून ती आपल्या दिरासह कामा हॉस्पीटलमध्ये प्रसूतीसाठी जात होती. त्या महिलेला जास्त वेदना होऊ लागल्याने रेल्वे पोलीस मणियार, बाबर, जगदाळे यांनी तातडीने मदत केली व त्या महिलेची प्रसूति सुखरुप व्हावी म्हणून आडोसा केला व ती महिला बाळत झाली. बाळ व बाळतीण सुखरुप असून दोघांना हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले असल्याचे त्यानी सांगीतले.

डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी

मध्यरेल्वेने आज अचानक कामाचा दिवस असूनही रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल सोडण्याची घोषणा केली. यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. मुंबईला जाणार्या पाच व तीन क्रमांकाच्या फलाटावर तसेच सर्व जिने प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब झाले होते. अगदी मुंगीलापण आत शिरता येत नव्हते, लोकल आली की प्रवासी आत प्रवेश करण्यासाठी तुटुन पडत होते. महिलांच्या डब्याजवळ खास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच जिन्यावर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून आरपीएफ व लोहमार्ग पोलीस प्रयत्न करत होते.

रेल्वेने अचानक रविवारचे वेळापत्रक जाहीर केल्याने प्रवाशांना त्याची माहिती नव्हती. त्यामुळे प्रवासी आपल्या नियोजित वेळेप्रमाणे स्टेशनवर येत होते. यामुळे सकाळी ११ पर्यत रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती अशीच अवस्था कोपर व ठाकुर्ली रेलवे स्थानकावर झाली होती. या संदर्भात डोंबिवली रेल्वे स्थानकाचे प्रबंधक अब्रहम म्हणाले दोन दिवसांच्या प्रचंड पावसाने १०-१२ मोटरमन कोच मध्ये पाणी गेले व रक खराब झाले यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला या संदर्भार्त प्रवाशांचा होणारा त्रास, रेल्वे फलाटांवरील गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने रविवारचे वेळापत्रक रदद करुन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे लोकल सोडण्याचे जाहीर केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email