रेल्वेत चुकून धक्का लागला म्हणून महिलेने घेतला चावा
Hits: 2
मुंबई दि.२१ :- रेल्वेतून प्रवास करताना शेजारी असलेल्या महिलेला तिचा चुकून धक्का लागल्याने त्या महिलेने चावा घेत, नखाने जबरदस्त ओरखडल्याची घटना घडली आहे. दादर ते लोअर परेल स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. या प्रकारानंतर पिडितेने तात्काळ रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. पिडित तरुणी रात्री ९च्या दरम्यान प्रवास करत असताना, गर्दी असल्याने शेजारी असलेल्या महिलेला तिचा चुकून धक्का लागला.
हेही वाचा :- जिल्ह्यातील खड्ड्यांची नवरात्रापूर्वी दुरूस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
धक्का लागल्याने त्या महिलेने पिडितेला जोरदार धक्का दिला. पिडित तरुणीने याला विरोध केल्याने त्या महिलेने तिला नखे ओरखडण्यास सुरुवात केली. पिडितेने याबाबत पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे सांगताच, त्या महिलेने तिला दंडावर जोरदार चावा घेतला आणि ती माहिम स्टेशनला उतरली. नखे ओरखडल्याने, जोरदार चावा घेतल्याने पिडितेच्या दंडावर, हातावर, मानेवर जखमा झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकाराबाबत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?