मिरा-भाईंदर शहरास २४ तासाकरीता पाणी पुरवठा खंडित
मिरा-भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी जलशुद्धीकरण केंद्र, जांभूळ येथील जलवाहीनीची तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने मिरा-भाईंदर शहरास एम.आय.डी.सी. कडून होणारा पाणी पुरवठा गुरुवार दि.२१/११/२०१९ रोजी मध्यरात्री १२.०० ते शुक्रवार दि.२२/११/२०१९ रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यत (२४ तासाकरीता) बंद राहणार आहे.
हेही वाचा :- रामदेवला महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही- डॉ. जितेंद्र आव्हाड
तसेच स्टेम कडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे. तरी एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मिरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होईल. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पुरेसा पाणीसाठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.