डोंबिवली ; बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे विक्रणारे त्रिकुट गजाआड

डोंबिवली दि.०९ – बेकायदेशीरपणे गर्भपाताची औषधे विक्रणारे त्रिकुटाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून कल्पेश कदम, आशिष गुप्ता व पंकज रावळ अशी त्रिकुटाची नावे असून हे तिघेही मेडिकल स्टोर मध्ये काम करीत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या तिघांना शुक्रवारी कल्याण कोर्टासमोर हजर केले असता न्यायलयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शासना कडून बेकायदेशीर पणे गर्भपात करणार्या हॉस्पीटलवर कारवाईचा बडगा उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीर गर्भपाताची औषधे विक्री केली जात आहेत. डोंबिवलीत हि असाच एक प्रकार उघडकीस आल असून या या टोळीचा पोलिसांनी भांडा फोड केला आहे डोंबिवली मध्ये काही मेडिकल स्टोर मध्ये बेकायदेशीरपणे गर्भपातावरील औषधाची विक्री केली जात असल्याची माहिती रामनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांना मिळाल्याने वपोनी पवार यांच्या मार्गदर्शना खाली पो.ह.शिंगटे, पो.ना.वाघ,पो.शि.भालेराव, पो.शि.रावखंडे,पो.शि. शिर्के,म.पो.शि. बोडार या पथकाने या टोळीचा शोध सुरु केला.

हेही वाचा :- डोंबिवली अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी ‘स्वच्छता मार्शल` संकल्पना

डोंबिवली पूर्वेतील राजकमल मेडिकल स्टोरमध्ये काम करणारा कल्पेश कदम याच्याकडे बेकायदेशीर औषधे सापडल्याने या औषधा बाबत चौकशी केली असता त्याला सदरची औषधे याचा मेडिकल स्टोर मध्ये काम करणारा आशिष कांता प्रसाद गुप्ता याच्याकडून घेतल्याचे सांगितले. आशिष कांता प्रसाद गुप्ताकडे या औषधा बाबत अधिका चौक्शिन्केली असता त्याने ही सदरचे औषधे राजलक्ष्मी केमिस्ट मध्ये काम करणारा पंकज रावल याच्या कडून मिळाल्याचे सांगताच पोलीसांनी कल्पेश,आशिष व पंकज या तिघाना ताब्यात घेऊन त्याच्या कडील असलेल्या औषधे जप्त करीत या औषधा बाबत अन्न व औषध प्रशासन पद्तालानिसाठी पाठवली असता जप्त केलेली औषढांचा उपयोग अविध्य्रीत्या गर्भपात करणे करीता होत असल्याचे निष्पन्न झाल्याने या त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल करीत १५ हजाराचा मुद्देमाल जप्त करीत त्यांना अटक केली या तिघांना शुक्रवारी कल्याण कोर्टासमोर हजर केले असता न्यायलयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email