तबला आणि शास्त्रीय संगीताच्या मेजवानीने देवगंधर्व महोत्सवाची सांगता

Hits: 1

डोंबिवली दि.१८ :- उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कल्याण गायन समाज आयोजित मानाच्या देवगंधर्व महोत्सवाचा सोमवारी तिसरा दिवस होता. महोत्सवाची सांगता करताना तबला आणि शास्त्रीय संगीताच्या मेजवानीने उपस्थित रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. पहिल्या सत्राचे मानकरी उस्ताद अल्लारखा यांची 23 वर्षे तालीम लाभलेले दिग्गज व बुजुर्ग तबलावादक पं. योगेश समसी होते. वादनासाठी पंडितजींनी ताल त्रिताल निवडला होता. लेहरा संगत करणारे गुरुप्रसाद गांधी यांनी सुरूवातीलाच मिश्र काफी रागातील आलापीने मैफिलीची वातावरण निर्माण केली.

हेही वाचा :- Dombivali ; ऑर्कर मंचच्या मंचावर रंगली सुरातील लिटिल स्टारची स्पर्धा

पुढे येणाऱ्या जबरदस्त वादनाची जणू काही ती नांदीच होती. पुढील जवळजवळ दीड तास पेशकार, कायदे, रेले, तुकडे, चक्रधार, तिहाया अशा अनेक अंगांनी एकलवादन खुलत गेले. पहिल्या सत्राच्या शेवटी पं. योगेश समसी व पं. रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते महोत्सवाच्या निमित्ताने सांगितिक वंशवेल या विषयावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

अध्यक्ष राम धस व उपाध्यक्ष अविरत शेटे यांनी महोत्सवाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले. मोहित ताम्हणकर यांनी आभार मानले. मोगुबाई कुर्डीकर व गानतपस्वी किशोरी अमोणकार यांच्याकडून तालीम प्राप्त झालेले जयपूर अत्रोली घराण्याचे बुजुर्ग गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी दुसऱ्या सत्राची धुरा सांभाळली.

हेही वाचा :- २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण

भूप रागातील विलंबित त्रितालातील प्रथम सूर साजे…या बंदीशीने या सत्राला प्रारंभ झाला. द्रुतलयीत अध्धा तिनतालात सुप्रसिद्ध सहेला रे…ही चीज ऐकवून पंडितजींनी रसिकांची मने जिंकली. शुद्धध आकारातील आलापी, मिंड, गमक व दाणेदार ताना ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये वारंवार प्रत्ययास येत होती. रसिकांच्या आग्रहास्तव दिम तन दीर दीर तन ह्या तरण्याचीही झलक व वसंत बहारमधील त्रितालातील पिया मोरी मान रे मान रे…हा छोटा ख्याल त्यांनी सादर केला. सुप्रसिद्ध पद्मनाभा नारायणा या भजनाने आपल्या सत्राचा व महोत्सवाचा समारोप पंडितजींनी केला. तीन दिवस चाललेल्या या संगोतोत्सवाने रसिक तृप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.