डोंबिवली ; विद्यार्थ्यांला ४० हजारांना लुबाडले
डोंबिवली दि.०५ – डोंबिवली पूर्व येथील पलावा सिटी येथे राहणारा १७ वर्षीय विद्यार्थी सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास याच परिसरातील एटीएम मधून ४० हजारांची रोकड काढून दुचाकीने घरी परतत होता. याच दरम्यान त्याच्या मागावर असलेल्या दोघा अज्ञात मुलानी त्यांना हटकले. या दोघांनी त्याला बोलण्यात गुंतवून दुचाकीच्या दिक्कीमधून रोकड काढून तेथून पळ काढला .काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी दोन अज्ञात मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :- कल्याणच्या ग्रामीण भागात चाळमाफियांचे थैमान ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीतून गौप्यस्फोट
Please follow and like us: