हिंदूंच्या संघटितशक्तीच्या दबावाचा परिणाम; ‘दबंग ३’ चित्रपटाच्या गाण्यातील आक्षेपार्ह प्रसंग वगळले !

आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटातील ‘हूड हूड दबंग’ या  गाण्यात हिंदु साधू आणि देवता यांचा अपमान केल्याने हिंदु समाजात संतापाची भावना निर्माण झाली होती. देशभरात अनेक हिंदुत्ववादी संघटना, आखाडा परिषद, संतसमाज आदींनी याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. हिंदु जनजागृती समितीने या चित्रपटाच्या विरोधात ‘सेन्सॉर बोर्डा’ला निवेदन दिले, त्यानंतरही काही न झाल्याने पुणे येथे डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तसेच देशभरात अनेक ठिकाणी समितीने आंदोलनेही केली.

हेही वाचा :- तबला आणि शास्त्रीय संगीताच्या मेजवानीने देवगंधर्व महोत्सवाची सांगता

परिणामी काल ‘सेन्सॉर बोर्डा’च्या अधिकार्‍यांनी समितीच्या शिष्टमंडळाला आक्षेपार्ह प्रसंग वगळल्याचे तोंडी सांगितले, तसेच आज ‘सलमान खान फिल्म्स्’च्या वतीने ‘सर्वांच्या भावना लक्षात घेऊन ‘हूड हूड दबंग’ या गाण्यातून आम्ही काही दृश्ये वगळत आहोत’ ट्वीट करून जाहीर करण्यात आले. त्यामुळे ‘देर आये दुरुस्त आये’ या म्हणीनुसार उशीरा का होईना, हा निर्णय घेतला गेला. हा निर्णय हिंदूंच्या संघटितशक्तीच्या दबावामुळेच घ्यावा लागला असून यापुढेही कोणी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून चित्रपटनिर्मिती करतील, त्यांना अशाच विरोधाला सामोरे जावे लागेल, अशी चेतावनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रसंग दिली. तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना, संतसमाज आदींनी केलेल्या विरोधाबद्दल त्यांचे आभारही मानले.

हेही वाचा :- Dombivali ; ऑर्कर मंचच्या मंचावर रंगली सुरातील लिटिल स्टारची स्पर्धा

‘दबंग ३’ या चित्रपटाच्या एका गाण्यात हिंदु साधूंना जटा-केस गाण्याच्या चालीवर ठेका धरत उडवतांना, तसेच सलमान खानबरोबर हिडिस पद्धतीने नाचतांना दाखवले होते. काही साधूंना गिटार वाजवतांना दाखवले होते. यावर प्रतिक्रिया देतांना ‘ते खरे साधू नाहीत’ अशीही उद्धटपणे टिप्पणी केली होती. याच गाण्यातील एका दृश्यात गाण्याच्या तालावर श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान शिव हे सलमान खानला आशीर्वाद देतांना दाखवले होते. त्यामुळे समस्त हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणातून ‘बॉलीवूड’ने धडा घ्यावा आणि चित्रपटांतून धार्मिक विडंबन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही श्री. शिंदे म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email