शेकडो भाविकांच्या उपस्थितीत डोंबिवलीत तिरुपती बालाजीचा दर्शन सोहळा संपन्न
डोंबिवली दि.०१ – अनेक भाविकांना इच्छा असूनही अनेक कारणांमुळे तिरुपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेणे शक्य होत नाही. भाविकांची ही अडचण लक्षात घेऊन तिरुमला तिरुपती देवस्थानने मंगल महोत्सवाचा मान डोंबिवली परिसराला मिळाला. यामुळे सकाळी क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर उउभारलेल्या भव्य मंडपात तिरुपती बालाजीचा धार्मिक सोहळा शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
हेही वाचा :- बरेच दिवस मराठा समाज ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज आला
तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्री ओम साईधाम मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून तिरुपती येथे होणारी नियमित पूजा अर्चा व इतर धार्मिक विधी संपन्न झाले. या प्रसंगी शिवसेनेचे खा डॉ. श्रीकांत शिंदे व आमदार सुभाष भोईर सपत्नीक व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे उपस्थित होते. राज्यमंत्री रवीद्र चव्हाण यांनी देखील सकाळी भेट दिली.सकाळी ६ वाजल्यापासून सुप्रभात विधीला प्रंरभ झाला देवाला मंत्रोच्चाराच्या घोषात उठवण्यात आले.नंतर फुलांचा अभिषेक करण्यात आला सर्व फुले बंगलोर येथून खास विमानाने मागवण्यात आली होती नंतर कुंकुमार्चना करुन देवाला प्रर्थना करण्यात आली व शेवटी तुलाभार करण्यात आला.
हेही वाचा :- हॉलिवूड ऍक्टर ड्वेन जॉनसन उर्फ द रॉक या अभिनेत्याकरता प्रियंकाने बुक केलं चॉपर
या प्रसंगी खा डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांनीही तुला करुन दान केले.या सर्व कार्यक्रमाला मोठया संख्येने महिला नागरिक उपस्थित होते. दुपारी १२-३० ते २.३० पर्यत विश्रांतीसाठी देव पाथर्ली येथील बालाजी मंदिरात नेण्यात आले व अडीच वाजता शोभा यात्रेसाठी आयरे येथील श्री विठठल मंदिरात नेण्यात आले. दुपारी ३ वाजता आयरे विठठल मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली बालाजीचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर नागरिक मेाठया संख्येने उपस्थित होते. आयरे रोड,चार रस्ता टिळक चौक, घरडा सर्कल मार्गे पुन्हा भव्य मंडपात शोभा यात्रा विसर्जित करण्यात आली.