दसरा-दिवाळीत पेट्रोल शंभरी ओलांडण्याची शक्यता
पुणे दि.२६ – देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढलेत. पेट्रोल १४ पैसे तर डीझेल ११ पैसे महाग झालंय. नजीकच्या भविष्यात हे दर खाली येण्याची शक्यताही हळहळू मावळत चाललीय. दसरा-दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोलचा दर शंभरी ओलांडण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाचे भाव पुन्हा एकदा बॅरलमागे १०० डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात वर्तवण्यता येत आहे. रविवारी झालेल्या ओेपेक या कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या देशांच्या संघटनेच्या बैठकीत भाव कमी करण्यासाठी कुठलीही ठोस पावलं उचण्यात येणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आधीच ८० डॉलरचा टप्पा ओलांडलेले कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढणार आहेत.
Please follow and like us: