वाहतुक कोंडी विरोधात उठविला आवाज, प्रशासन लागले कामाला
Hits: 0
उरण दि.२४ :- मध्ये प्रचंड प्रमाणात होणारी वाहतुक कोंडी, जिवघेणे खड्डे या समस्या विरोधात उरण मधील तरुण तरुणींनी एकत्र येत युवा उरण व ट्रेफिक मुक्त उरण या व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून रस्ते खड्डे व वाहतुक कोंडी समस्या संदर्भात जनजागृती करत उरण मधील पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, NHAI, JNPT प्रशासन आदि विविध ठिकाणी निवेदने देउन रस्त्यातील खड्डे, वाहतुक कोंडी सोडविण्याची मागणी केली होती. त्यास प्रशासनाने उत्तम प्रतिसाद दिला असून त्याचा प्रतिसाद म्हणून लगेचच करळ ब्रीज वरिल कामाची सुरवात करण्यात आली. ब्रीजवर पडलेले मोठे मोठे खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळी वर सुरु झाले आहे.
हेही वाचा :- आचारसंहिता भंग केल्यास कडक कारवाईचा जिल्हाधिका-यांचा इशारा
त्यामुळे उरण मधून या मार्गावरुन नवी मुंबई, मुंबई, पनवेल या ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले आहे. भूपेंद्र थळी, सुदेश कासेकर, प्रतीक पाटिल, सुनील टाक, मनीषा सनस, तृप्ती भोईर, रत्नदीप पाटिल, तेजस्वी पाटिल आदि तरुण कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने युवा उरण व ट्रेफिक मुक्त उरण या व्हॉट्स ऍप ग्रुपची निर्मिति करण्यात आली. व सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दि 22 रोजी करळ फाटा येथे सुमारे 150 ते 200 तरुण कार्यकर्ते काळे वस्त्र परिधान करून एकत्र आले व त्यांनी प्रशासनाचा जाहिर निषेध केला.
हेही वाचा :- पूरग्रस्त् विभागातील कोल्हापूर आणि सांगली विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत…
यावेळी युवा कार्यकर्त्यांनी प्रत्येक सबंधित विभागाला निवेदन देउन ही समस्या अधिकारी वर्गांच्या निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांनी लगेच पाउले उचलण्यास सुरवात केली आहे. करळ ब्रीजवर आता खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे. टप्प्या टप्प्याने उरण मधील सर्व रस्त्यावरिल खड्डे बुजविन्यात येणार आहेत. प्रशासनाकडून वाहतुक कोंडी सोडविण्याचेही आश्वासन मिळाले आहे. संघटने कडून तरुण कार्यकर्त्यांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अवधि दिला आहे प्रशासना कडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास या तरुण युवा कार्यकर्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.
Dombivali में कर्ज दिलवाने के नाम पर सैंकड़ों लोगों से करोड़ों का धोखाधड़ी, विष्णु नगर में मामला दर्ज।