हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र…

मुंबई दि.०२ :- शिवसेना-भाजप युती तुटली असतानाच मनसेने अचानक हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील याबद्दल राजकीय स्थितीत हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र होऊ शकतो असे भाजपाला वाटते. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत करत मनसे आणि भाजप युतीचे संकेत दिले होते.

हेही वाचा :- वाहतूक पोलीस विलास शिंदेंची हत्या करणाऱ्या अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा

त्यामुळे आगामी २०२२ मधील महापालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि भाजपा एकत्र येऊन नवीन समीकरण तयार करणार आहे का हे येणाऱ्या काळात समोर येणार आहे. मनसेने मराठी सोबतच हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर महाराष्ट्रात मनसे व भाजप या दोन्ही पक्षांमधील जवळ अधिकच वाढत चालली असून आज पुन्हा भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी कृष्णकुंज निवासस्थानी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा :-  कल्याणमध्ये घरफोडी

तासभर चाललेल्या या बैठकी नंतर मनसे भाजपा युतीचे पुन्हा नव्याने चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे भाजपातील जवळीक वाढू लागली आहे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा मोर्चा आधी देखील आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी प्रभादेवी येथील इंडिया बुल अलास्का येथे राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतली होती. त्यामुळे भाजपाचे नेते राज ठाकरे यांची नेमक्या मुद्द्यावर चर्चा करत आहे हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email