कोपर रेल्वे स्टेशन येथे लोकलने चार जणांना उडवले
कोपर दि.०३ – कोपर रेल्वे स्टेशन येथे लोकलने एका दोन वर्षे मुलासह चार जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
हेही वाचा :- LIVE UPDATE ; रुळावरून घसरले सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे, 7 जणांचा मृत्यू
सुनिता बंगाले (62) प्रीती राणे (26) तर दोन वर्षीय निवेश उदय राणे यांचा मृत्यू झाला आहे. तर भास्कर चंदू (65) हे गंभीर रित्या जखमी आहेत. तिन्ही रहिवाशी कल्याण पूर्व कोळसेवाडी येथील होते तर सुनीता बंगाले हे कोपर पूर्व येथील रहिवाशी होत्या.
Please follow and like us: