माजी शाखाप्रमुख मोहन राघो भोईर यांचे प्रदिर्घ आजाराने निधन बाळासाहेबांच्या एकनिष्ठ शिवसैनिकांस अखेरचा निरोप.
उरण दि.३१ – मोठीजुई शिवसेनेचे जेष्ठ, एकनिष्ठ कार्यकर्ते आणि माजी शाखाप्रमुख मोहन राघो भोईर यांचे दिनांक २९/०३/२०१९ रोजी रात्री १० वाजता प्रदिर्घ आजाराने निधन झाले आहे.मोहन भोईर यांची अंत्ययात्रा दिनांक ३०/०३/२०१९ रोजी सकाळी ९:०० वाजता निघून मोठीजुई येथिल स्मशानभूमीत तमाम शिवसैनिक,नागरिक,ग्रामस्थ व पाहुणी नातेवाईक मित्रमंडळी,नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. मोहन राघो भोईर हे मुळचे उरण तालुक्यातील मोठीजुई गावचे रहिवासी.पेशाने शेतकरी व स्वतःचा बैलगाडी व्यवसाय हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन.तर गवंडी काम,सुतार काम हा त्यांचा जोडधंदा करत असत.बाळासाहेबांच्या शिवसेना स्थापनेपासुन एक कट्टर शिवसैनिक ते थेट शाखाप्रमुख पदावर जाऊन त्यांनी “शिवसेना” मोठ्या ताकदिनीशी सांभाळली.
शिवसेनेत काम करत असतांना जेष्ठ शिवसैनिक स्व.गंगाराम भोईर यांच्या सोबत पक्षसंघटना मजबुत करुन शिवसेनेची पुढील वाटचाल ही युवकांच्या पाठबळाने वाढावी या दृष्टिकोनातून शिवसेनेचा पुढील कारभार गावातील युवकांच्या खांद्यावर सोपविला.तेव्हापासुन आता पर्यंत युवा तरुणच शिवसेनेचा “शाखाप्रमुख” राहिला आहे. उरणमधील असंख्य छोट्या मोठ्या नेते मंडळींशी चांगला परिचय राहीला.विकासाचे मुद्दे हे मोहन भोईर सतत आपले प्रश्न तत्कालीन रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आणि विद्यमान आमदार सन्माननिय मनोहरशेठ भोईर यांना थेट भेटून,फोन करुन सांगत असत.(महिन्यातून १/२ फोन आमदार साहेबांना असायचेच). अखेर वयाच्या ७६ व्या वर्षी प्रदिर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मावळली.
शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात एकदिलाने काम करुन शिवसेना संघटना मजबुत करण्यासाठी मोलाचा वाटा उचलण्यात मोठा सहभाग असणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकाला गमावल्याची खंत आज परिसरातील प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात राहुन गेली आहे.घराघरात शिवसेना पोहचऊन शिवसेनेचा कार्यकर्ता तयार करण्याची त्यांची शैली आज शिवसैनिकांना वेगळी शिकवण देऊन गेली.विरोधकांच्या उत्तराला प्रतीउत्तर देउन शिवसेना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारे शिवसैनिक हिही त्यांची ओळख वेगळीत दिशादर्शक ठरली.अशा या एकनिष्ठ शिवसैनिकास मोठी जुई मधील तसेच उरण तालुक्यातील सर्व शिवसेना युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहीली.स्वर्गीय मोहन राघो भोईर यांचे दशक्रीया विधी – रविवार दिनांक ०७ एप्रिल २०१९ रोजी(मोठीजुई,दमखाडी उघड येथे सकाळी ९:३० वाजता)तर तेरावे विधी – बुधवार दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी राहत्या घरी होईल.तसेच बुधवार दिनांक १० एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजता श्री गुरुदत्त प्रासादिक भजन मंडळ मोठीजुई यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.