कल्याणच्या वालधुनीत महिन्याभरापासून विजेचा लपंडाव विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम
डोंबिवली दि.०२ :- लोडशेडिंगचा संबंध नसतानाही कल्याणच्या वालधुनी परिसरात दररोज आठ तास वीज पुरवठा खंडित करून रहिवाश्यांना वेठीस धरण्याचा प्रकार महावितरण कंपनीकडून सुरू आहे. दररोजच्या वीज खंडित प्रकरणामुळे वालधुनीतील रहिवासी मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी कोणताही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
हेही वाचा :- तालसंग्राम ढोल-ताशा स्पर्धेला राज्यभरातून १३ पथकांचा समावेश कल्याण-डोंबिवलीकर रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याणच्या पूर्व भागातल्या वालधुनीमध्ये मागील महिन्याभरापासून दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. वीज खंडित होत असल्यामुळे या परिसरातील रहिवाशी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कार्यालयात तक्रारी करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दिवसभरात आठ तास बत्ती गुल होत असल्यामुळे घरातील अनेक महत्वाची कामे रखडत असल्याचा आरोप या भागातील गृहीणी करू लागल्या आहेत.
हेही वाचा :- केडीएमसीच्या रस्त्यावर शिजतेय दम बिर्याणी फुटपाथसह आता रस्त्यावरही अतिक्रमण
एकीकडे स्वयंपाक, घरकाम, मुलांचे अभ्यास, तसेच त्यांचे शाळेतील प्रोजेक्ट् देखिल अपूर्ण राहत आहेत. परिणामी केवळ बत्ती गुलमुळे मुलांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप वालधुनीतील रहिवासी गीता दळवी यांनी या संदर्भात बोलताना केला. तर दुसरीकडे आम्ही नियमित वीज बिल भरून देखील आमच्या विभागातील वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, असे फाल्गुनी जाधव या गृहणीचे म्हणणे आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी करून देखील महावितरण कंपनीकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात येतात.
हेही वाचा :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमानोत्तर कार्य चार खंडात नव्याने प्रकाशित होणार
मागील महिन्याभरापासून या परिसरातुन अनेक वीज पुरवठा नियमित करावा, यासाठी पत्रव्यवहार करून देखील जाणूनबुजून महावितरण अधिकाऱ्यांकडून तक्रारींकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप वालधुनीतील रहिवासी करीत आहे. लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त रहिवाश्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर महावितरणचे अधिकारी माहिती देण्यास तयार नसल्याने वालधुनी भागात आठ तास बत्ती गुल हेण्याचे तांत्रिक कारण कळू शकले नाही.