डोंबिवलीचे ‘ भोपाळ ‘ होणार अशी भीती मुद्दाम निर्माण केली जात आहे 

डोंबिवली दि.२३ :- औद्योगिक विभागात ५५० कारखान्यांपैकी १२५ रासायनिक तर १२८ कापड व उरलेल्या इतर कंपन्या आहेत डोंबिवलीतील कोणत्याही कंपनीत गैस वापरला जात नाही तरीही एखादी दुर्घटना घडली की डोंबिवलीचा ‘ भोपाळ ‘होण्याची भीती मुद्दाम वैयक्तिक स्वार्थासाठी दाखवली जात असून याचा त्रास उद्योजकांना होतो असे प्रतिपादन ‘ कामा ‘संघटनेने केले आहे. डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वारतालाप कार्यक्रमात  ‘ कल्याण अंबरनाथ उत्पादक संघ ‘(कामा )चे अध्यक्ष देवेन सोनी यांनी वरील प्रतिपादन केले.
देवेन सोनी म्हणाले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उद्योजक येत्या आठवड्यात भेटत असून त्यांना येथील वस्तुस्थिती सांगणार आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेत स्थळावर प्रदूषणाबद्दल २० टक्के तक्रारी असल्याचे निदर्शनात आणले कंपन्यात होणाऱ्या अपघात प्रसंगी तातडीने मदत करण्यासाठी ‘ कामा ‘तर्फे लवकरच नियंत्रण कक्ष तयार करण्यात येत असून एक टीम तयार निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले डोंबिवली औद्योगिक विभाग स्थापन होऊन ६ दशके होऊनही औद्योगिक विभागाचे स्वतःचे फायर स्टेशन नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली व किमान 3 फायर स्टेशनची गरज त्यांनी व्यक्त केली 
औदयोगिक विभागाचे स्थलांतर करण्याची चर्चा आहे याकडे लक्ष वेधले असता माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले ,ओद्योगिक भागापासून निवासी भाग ५०० मीटर्स लांब असावा व बफर झोन निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली व उदयोग हलवण्यापेक्षा निवासी भाग हलवण्याची मागणी केली जर धोकादायक कंपन्या हलवण्यास उद्योजक ठाम विरोध करतील व प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा त्यानी दिला या प्रसंगी कामा चे अध्यक्ष देवेन सोनी ,माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी ,मार्ग च्या अध्यक्षा भारती चौधरी ,राजू बेल्लूर आदी उपस्थित होते 
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email