Dombivali ; बेडरूममधील पलंगावर विषारी सापाला पाहून कुटूंबाची उडाली झोप
डोंबिवली दि.२९ :- बेडरूम मधील पलंगावर झोपण्याच्या आदीच एका विषारी सापाला पलंगावर पाहून कुटूंबाची झोप उडाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिमेकडील सापर्डे गावातील एका घरात घडली आहे. कल्याण पश्चिमेला सापर्डे, उंबर्डे, कोळीवाली गावाच्या परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यामुळे बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत.
हेही वाचा :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप
अशीच एक घटना सापर्डे गावातील भोईर यांच्या घरात काल रात्रीच्या सुमारास घडली भोईर कुटंब एकत्रित जेवण करून झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले असता, त्यांना विषारी घोणस साप दिसला या सापाला पाहताच भोईर कुटूंबाचा थरकाप उडाला होता. याच दरम्यान कुटूंब प्रमुख भोईर यांनी बेडरूममध्ये घुसल्याची माहिती सर्पमित्र हितेश याला दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेशने पलंगावरील चादरीत लपून बसलेल्या विषारी घोणस सापाला त्यानंतर सर्पमित्र हितेशने कापडी पिशवीत या विषारी घोणसला बंद केल्याने भोईर कुटुबांने सुटकेचा निश्वास घेतला. वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून विषारी घोणसला जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली.