थुंकु नका सांगितल्याने कुटुंबाला घरात घुसुन मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

वाकड दि.०७ :– घरासमोर थुंकू नका, असे सांगितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून घरात घुसून कुटूंबाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि.७) सकाळी काळाखडक, वाकड येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल सुभाष शिंदे (वय ३३), बाळकृष्ण सुभाष शिंदे (वय ४५), दत्तात्रय राजाराम खंडागळे (वय ४०) आणि नन्या ऊर्फ जय बाळकृष्ण शिंदे (वय १९, सर्व रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. सचिन भगवान कांबळे (वय २५) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून यांनी मंगळवारी (दि.७) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आरोपी विठ्ठल शिंदे हा फिर्यादी कांबळे यांच्या घरासमोर थुंकला. यामुळे कांबळे यांनी त्यास येथे थुंकू नको, सध्या करोना आहे, असे सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी कांबळे आणि त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत सुरवातीला हाताने मारहाण केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत गंभीर जखमी केले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email