कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा १४ हजार रुपये बोनस मिळणार

कल्याण दि.२० :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा १४ हजार रुपये बोनस मिळणार असून हा संघटनेचा मोठा विजय असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना नेते रवी पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. त्याबाबत प्रतिक्रिया देताना पाटील यांनी हा युनियनचा मोठा विजय असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा :- राज ठाकरे विधानसेभेचा निर्णय उद्या सांगणार

तसेच बोनस आणि सातव्या वेतन आयोगासाठी युनियनने गेल्या काही दिवसांत विविध आंदोलने केली. त्यात द्वारसभा, घंटानाद, लोकप्रतिनिधींना गुलाबपुष्प वाटप आदींचा समावेश होता. परिणामी महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा १ हजार रुपये अधिक म्हणजे १४ हजार बोनस देण्याचे जाहीर केले. तर विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच सातव्या वेतन आयोगाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही रवी पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान महापालिकेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

डोंबिवलीकरांना कुणी रस्ता देता का रस्ता ?

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email