मृतदेहाचे तुकडे करून ७० किलोमीटर परिसरात फेकले

दिल्ली दि.०८ :- २०११ साली २२ वर्षांचा असणाऱ्या रिक्षाचालक रवि याचा तुकड्यांमध्ये विखुरलेल्या मृतदेहाचे अंश गोळा करण्यात पोलिसांना यश आलंय. रवि याची हत्या त्याच्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं मिळून केल्याचंही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. २०११ साली घडवून आणण्यात आलेलं एक अपहरण आणि हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात पोलिसांनी तब्बल नऊ वर्षानंतर यश मिळालंय.

हेही वाचा :- नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात घाई; भविष्यात त्यांना नक्की जाणीव होईल’ – अविनाश जाधव

या प्रकरणाची सुरुवात झाली ती २०१० साली. कमल हा अलवकर जिल्ह्यात कन्स्ट्रक्शनच्या कामावर होता. जवळच राहणाऱ्या शकुंतला नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम जडलं. शकुंतलाही त्याच्या प्रेमात होती. परंतु, तिच्या घरच्यांनी मात्र त्यांच्या प्रेमाला नकार देत शकुंतलाचं लग्न दिल्लीच्या समालखा भागात राहणाऱ्या रविशी लावून दिलं. रवि दिल्लीत रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता.

Leave a Reply

Your email address will not be published.