२८ जुलै रोजी डोंबिवलीत 18 वी शिवाई मिनी मॅरेथॉन स्पर्धा
डोंबिवली : शिवाई बालक मंदिर ट्रस्ट आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धा येत्या 28 जुलै रोजी सकाळी आठ वाजता क्रिडा संकुलाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे हे 18 वर्ष आहे सुमारे पाच हजार विद्यार्थी या मध्ये भाग घेतील अशी अपेक्षा आहे.
डोंबिवलीत क्रिडा संस्कृति रूजुन तिचे संवर्धन व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची जिद्द निर्माण व्हावी याउद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. कल्याण तालुक्यातील शाळा महाविद्यालयातील वय वर्षे 8 ते 18 पर्यतचे विद्यार्थी आठ गटांमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच मतीमंद व गतीमंद आणि कर्णबधिर मुले अशा दोन गटांचा सुध्दा यात समावेश करण्यात आला आहे. कल्याण तालुक्यातील शाळांनी येत्या 20 जुलै पर्यत स्पर्धकांची नावे शिवाई बालक मंदिर शाळेत नोंदवावीत असे आवाहन मुख्याध्यापिका मिताली इनामदार व मुख्याध्यापक मारुती शिंदे यानी केले आहे अधिक माहितीसाठी 8097165329 या क्रमांकावर संपर्क साधावा.