गाड्या चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश 105 चोरीच्या गाड्या जप्त , ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

(म.विजय)

ठाणे दि.०७ – ठाणे व आजूबाजूच्या परिसरात चारचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर व पोलीस सह आयुक्त मधुकर पांडे यांनी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या बाबत सूचना देऊन कारवाई करण्यास सांगीतले होते , त्याच दरम्यान दिनांक १०/१०/२०१८ रोजी व्रुन्दावन सोसायटी येथे राहणारे उद्धव नाना साठे यांची पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप चोरीला गेल्याची तक्रार राबोडी पोलीस स्टेशन दाखल झाली होती.

हेही वाचा :- लाडू किशोर स्वेन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

राबोडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा 379 प्रमाणे या बाबत गुन्हा दाखल झाला होता, त्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक महेश जाधव करत होते, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणअंती आपल्या पथकास पुण्याला जाऊन त्यांनी चोरीला गेलेली महेंद्र बोलेरो पिकअपचा शोध लाऊन ती ताब्यात घेतली, यात अजुन गाड्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्या मुळे त्यांनी त्याची तत्काळ माहीती अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण आणि पोलीस उपायुक्त डॉ .डी .एस .स्वामी यांना दिली, त्यांनी दिलेल्या सूचनेवरून वेगवेगळे पांच पथक तयार करून वाहन चोरणारे, चोरीचे वाहान खरेदी करणारे , चोरीच्या वाहानामध्ये इंजिन व चेसीस मध्ये फेरफार करणारे, नागालँड येथुन वाहानाचे आरसीबुक बनवणारे, बेळगाव कर्नाटक , राजस्थान येथे चोरीचे वाहान विकणारे एजंट अशा एकूण 9 जणांना अटक करण्यात आली, संदीप मुरलीधर लागू राहणार मुंबई महाराष्ट्र, सादिक मेहबूब खान मुल्ला राहणार बेळगाव कर्नाटक, अल्ताब अब्दुलगणी गोकाक राहणार बेळगाव कर्नाटक, विनीत रतन माधीवाल राहणार मुंबई महाराष्ट्र, मांगीलाल शुभनाराम जाखड नागौर राजस्थान, जावेद उर्फ बबलू मख्तार खान प्रतापगड उत्तर प्रदेश, अल्ताब एक्बाल कुरेशी राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश , मोहम्मद युसूफ नईम खान प्रताप गड उत्तर प्रदेश अशा या आरोपींची नाव आहेत, त्यांच्या कडे सखोल चौकशी केली असता आरोपींकडून 170 चोरीच्या वाहनांची माहीती पोलीसांना मिळाली, त्यांची तांत्रिक माहीती मिळवुन त्यातील 105 वाहान चोरीचे गुन्हे उघडकीस आले, त्यातील एकूण 80 वाहाने जप्त करण्यात आली त्या मध्ये 69 महिंद्रा पिकअप, 8 महिंद्रा बलेरो, 1 होंडा सिटी, 1 वेर्णा, 1 ब्रीझा असा सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये किमतीची वाहाने पोलीसांनी जप्त केली.

हेही वाचा :- लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरूणाचा बळी

गाड्या चोरणाऱ्या या टोळी मध्ये संदीप मुरलीधर लागू हा त्यांचा मास्टर माइंड असुन दुसरा आरोपी विनीत रतन माधीवाल याची आई बारबाला आहे व तिचे सबंध संदीप मुलारीधर लागू याच्या बरोबर होते , तिच्या मार्फत संदीप लागूची इतर आरोपींबरोबर ओळख झाली , ह्या सगळ्यांची मिळुन संदीप लागू याने गाड्या चोरणारी आन्तराज्यीय टोळी बनवली , ही टोळी महाराष्ट्रा मध्ये ठाणे शहर , ठाणे ग्रामीण , मुंबई शहर , नवी मुंबई , पालघर , रायगड , पुणे , अहमदनगर , नाशिक , गुजरात या ठिकाणाहून वाहाने चोरी करून पुणे येथे एका गोडाऊन मध्ये ठेवत असत , त्यानंतर त्या गाड्यांचे चेसीस व इंजिन नंबर यात बदल करून नागालँड येथुन वाहनांचे आरसी बुक बनवुन ते वाहान कर्नाटक व राजस्थान मध्ये एजंट मार्फत लोकांना विकत असत , अशी माहीती सह आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली तसेच त्यांनी लोकांना आव्हान केले आहे की सार्वजनिक रस्त्यावर अथवा निर्जन स्थळी आपले वाहान पार्किंग करू नये , जी .पी एस सिस्टिम तसेच तस्तम यंत्रणा गाडीमध्ये बसवण्यात यावी , शक्यतो सीसीटीव्हीच्या निगराणी मध्ये आपले वाहान पार्क करण्यात यावे , गाडीमध्ये स्टेअरिंग लॉक आणि अलार्म सिस्टिम बसवण्याची व्यवस्था करावी.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email