मॅरेथॉन स्पर्धेसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या महानगर पालिकेची दिव्यातील पूरग्रस्तांना सोडले वाऱ्यावर.

(म.विजय)

दिव्यातील पुरग्रस्त नागरिकांना पुरातून वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ठाणे महानगर पालिकेने दिव्यातील पूरग्रस्तांना मदत करताना मात्र कमालीचा हात आखडता घेतला आहे. दिव्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीत 22 हजारापेक्षा जास्त कुटुंब बाधित झाली असल्याचे सर्वेक्षण महापालिकेतर्फेच करण्यात आले आहे पण महापालिकेतर्फे फक्त अडीच हजार कुटुंबांनाच मदत आली असल्याचे प्रभाग समिती च्या वतीने सांगण्यात येते. त्यामुळे दिवा विभागातील ९० % पुरग्रस्त महापालिकेच्या मदतीपासून अजूनही वंचित असून ठाणे महानगर पालिकेने दिव्यातील पूरग्रस्त वाऱ्यावर सोडल्याची भावना आज निर्माण झाली आहे.

शिवाय पूरग्रस्तांना ही तुटपुंजी मदत मिळवाणूंसाठी ३ ते ४ चार किलोमीटरची पाययपीट करावी लागत आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक तसेच विशेषतः महिला वर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आधीच पुरामुळे संसाराचा कंबरडा मोडल्या नंतर मदत मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत दिव्यातील पूरग्रस्तांना करावी लागत आहे. दिव्यातील सर्व पूरग्रस्तांना महापालिकेची मदत मिळावी यासाठी आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचे भाजपा दिवा शहर अध्यक्ष अँड. आदेश भगत यांनी सांगितले

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email
Facebook
Facebook