ठाकुर्ली रेल्वे कारशेड उभ्या असलेल्या लोकलला आग   

डोंबिवली दि.१५ :- ठाकुर्ली कारशेडमध्ये उभ्या असलेल्या लोकलच्या एका डब्याला आज दुपारच्या सुमाराला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यतसंपूर्ण डब्बा जळून खाक झाला आहे. मध्य रेल्वेच्या  ठाकुर्ली कारशेड मध्ये ना दुरुस्त असलेल्या लोकल उभ्या करण्यात येतात.  गेल्या  दोन वर्षा पासून अशीच एक लोकल काही डब्बेसह उभी होती.
अचानक आज दुपारच्या सुमाराला या लोकलच्या एका  डब्यामध्ये आग लागली. या आगीची माहिती ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांना मिळताच, तिने कल्याण डोंबिवलीच्या अग्निशमन दलाच्या कार्यलयाशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशनमचे जवान घटनास्थळी दाखल होऊन अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले.
मात्र तोपर्यत या आगीत लोकलचा एक डब्बा संपूर्ण जळून खाक झाला आहे. दरम्यान ही आग नेमकी लागली की चोरांकडून लावण्यात आली याचा तपास सुरु असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. यावर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.  
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email