ठाकरेंचे ‘भाऊबंध’ जुळणार; ‘उद्धवदादू’च्या शपथविधीला ‘राजा’ जाणार?
मुंबई दि.२७ :- गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
हेही वाचा :- Viral Video ; ‘काकानं हात काढला तर पानपट्टीवाला तरी अजित पवारांना विचारल का?’
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ राज ठाकरे हे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना संपूर्ण कुटुंबासमवेत येण्याचे आमंत्रण देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकाळी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेही होत्या.
हेही वाचा :- नामजप आणि स्वभावदोष निर्मूलन यांमुळे आनंदप्राप्ती होते!
राज्यपाल कोश्यारी यांना पुष्पगुच्छ देऊन उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी त्यांचं स्वागत केले. उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या रुपाने महाराष्ट्राला मिळणार आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अनेक नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण पाठवू शकतात.
Hits: 1