नव्या प्रत्यक्ष कर कायद्याच्या मसुद्यासाठी कृती दलाची स्थापना
नवी दिल्ली दि.२६ – 1961 च्या प्राप्तीकर कायद्याचा आढावा घेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक गरजांची सुसंगत असा नवा प्रत्यक्ष कर कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे. या आधीच्या आदेशात थोडी सुधारणा करत सरकारने अखिलेश रंजन, सीबीडीटी सदस्य यांची कृती दलाचे संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. कृती दलाच्या इतर सदस्यांबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे कृती दल येत्या 28 फेब्रुवारीला आपला अहवाल सादर करेल.
हेही वाचा :- आपल्या चित्रपटाची कथा काळाच्या पुढे: प्रतिमा जोशी
Please follow and like us: