अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण

भारतीय पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाची मंजुरी

अंबरनाथ दि.१० :-अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.‌ मंदिराच्या मूळ संरचनेला कोणताही धक्का न लावता सुशोभिकरणात अनेक वास्तूंची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी येथे कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मंदिरापासून १०० मीटर अंतरामधील दुरुस्ती, नुतनीकरण कामे आणि १०० मीटर अंतराबाहेरील बांधकाम अशा दोन भागातील कामांचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे सादर केला होता.

रसायनाची पिंपे असलेला टँकर कलंडला

काही महिन्यांपूर्वी मंदिर दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामांसह बांधकाम स्वरुपातील कामांना पुरातत्व विभागाने तर शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेकडून काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरण कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सावनी हेरिटेज कंझर्वेशन प्रा.ली. या कंपनीला १०७ कोटी रुपयांच्या विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले.

ठाणे रेल्वे स्थानकात तीन हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल

सुशोभीकरणाचे संपूर्ण काम काळया पाषाणात केले जाणार आहे. यात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र,अँम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, बंधारा, भक्त निवास, घाट आणि संरक्षक भिंत यांचा समावेश आहे.

‘मनसे’ अध्यक्ष आजपासून ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या दौ-यावर

पक्ष कार्यालय उदघाटन, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक

मुंबई दि.१२ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या दौ-यावर आहेत. तीन दिवसांच्या या दौऱ्यात पक्ष कार्यालयांचे उदघाटन, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बैठका, पक्ष प्रवेश, प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटीगाठी आदि कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबईकर आणि ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार
या दौऱ्याच्यानिमित्ताने मनसे दोन्ही जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असून आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो.

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मिरा-भाईंदर, वसई, विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे शहर असा त्यांचा दौरा असणार आहे.

अंबरनाथ गोळीबार प्रकरणी ३३ आरोपींना ‘मोक्का’

ठाणे दि.२२ :- अंबरनाथ (पूर्व) येथील आनंदनगर औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन गटातील गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ३३ आरोपींना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे.

बैलगाडा शर्यत प्रकरणावरून ही घटना घडली होती. बोहनोली गाव येथे आयोजीत बैलगाडा शर्यतीच्या चर्चेसाठी राहुल पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनातून जात असताना गुरुनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांनी पाटील यांचे वाहन अडवून त्यांच्यावर गोळीबार केला होता.

गोळया झाडुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फिर्यादीसोबत असलेल्या इतर वाहनांची मोडतोड केल्याप्रकरणी गुरूनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात एकुण १० आरोपींना अटक करण्यात आले होती तर २३ फरार होते.