स्वच्छ भारत अभियान “कार कम बाइक रॅली”
नवी दिल्ली दि.१३ – नवी दिल्ली ते थ्वाइज, मनाली-लेहमार्गे या कार कम बाइक रॅलीला पश्चिम एअर कमांड मुख्यालय, नवी दिल्लीतील वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर, एअर मार्शल एन.जे.एस धिल्लॉन यांनी हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधानांच्या “स्वच्छ भारत” अभियानाला चालना देणे हा या रॅलीचा उद्देश आहे. पर्वतांवर स्वच्छता राखणे व ते कचरामुक्त ठेवण्याबाबत स्थानिक आणि पर्यटकांमध्ये जागरुकता या रॅली अंतर्गत करण्यात येणार आहे.
रॅलीमध्ये हवाई दलाचे १२ जण असून नवी दिल्ली येथे २४ ऑगस्टला तिचा समारोप होईल. अंबाला, मनाली, जिस्पा, पँग, लेह, पॅनयाँग, त्सो, थ्वाइज असा रॅलीचा मार्ग असेल.
Please follow and like us: