सुमन ताई तोगरे “सिंधुताई सपकाळ हिरकणी” पुरस्काराने सन्मानित.

 

उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )
उरण येथे झोपडपट्टीतील गोरगरीब शिक्षित अशिक्षित स्त्रीयांना एकत्रित करून त्यांना स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने सुमन ताई तोगरे यांनी महिला बचत गटाची स्थापना केली व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना सेवा सुविधा गोरगरिबांना मिळवून दिले.

स्त्रियांमध्ये शिक्षण, अर्थ व सहकार विषयी जनजागृती केली.तसेच विविध शासकीय हॉस्पिटल मध्ये मोफत औषध गोळ्या दान केले.

या कार्याची दखल घेत उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना आणि साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी यांच्या वतीने मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळ रायगडच्या अध्यक्ष सुमनताई तोगरे यांना सिंधुताई सकपाळ हिरकणी पुरस्काराने जालना येथे सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना व साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदर पुरस्कार जेष्ठ समाजसेविका सुमनताई तोगरे व जेष्ठ समाजसेवक संग्राम तोगरे यांनी एकत्रित स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published.