कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी उपाययोजना

Hits: 1

कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी,सरकारने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये,खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत तसेच खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत कबड्डीचा समावेश यासह इतर उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती,युवा आणि क्रीडा राज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी आज राज्य सभेत लेखी उत्तरात दिली.

हेही वाचा  :- कोरोना व्हायरस – केरळमध्ये तिसरा रुग्ण आढळला

भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्वालीयर इथल्या क्रीडा सुविधा, कबड्डीसह इतर क्रीडा प्रकाराना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणात कबड्डीपटूना प्रशिक्षण सुविधा पुरवण्यात आल्याची माहितीही या उत्तरात देण्यात आली आहे.

हेही वाचा  :- कोरोना विषाणू संदर्भात प्रवासविषयक सुधारित सूचना जारी

Leave a Reply

Your email address will not be published.