डोंबिवलीतील विविध विकास कामांमध्ये माझाच पुढाकार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा

डोंबिवली दि.०२ – रेल्वे फलाटाची उंची, सरकते जिने, ठाकुर्ली येथील स.वा,जोशी शाळेजवळील उड्डाणपूल, लोड शर्डिंग मुक्त डोंबिवली, पाणी समस्याचे निराकरण, वाहतूकव्यवस्थेसाठी योजना, रेगांळलेली रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकर लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा, कोपर रेल्वे पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न, मोठा गाव – माणखोली उड्डाणपूल या अश्या अनेक डोंबिवलीतील विकास कामांमध्ये माझाच पुढाकार असल्याचा दावा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. डोंबिवलीतील ब्राम्हण सभेच्या सभागृहात आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मधुकर चक्रदेव,बांधकाम व्यवसायिक दीपक मेजारी आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डोंबिवलीतील शिक्षकवर्ग, व्यापारी, पत्रकार यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली. उपस्थित मान्यवरांनी शहराच्या विकासाबाबत सूचना, तक्रारी सांगितल्या. यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुरुवातीला बोलताना डोंबिवलीत शहरात मतदानाच टक्का वाढला पाहिजे, यासाठी मतदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे असे सुचविले. पुढे ते म्हणाले, २००५ ते २०१४ या १४ वर्षात डोंबिवली शहरासाठी जे जे करायला हव होत. ते ते करण्याच्या प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहीन. शहराच्या अनेक विकास कामांत मी स्वतःहून पुढाकर घेतला. आजही अनेक समस्या सोडविण्यासाठी माझे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.डोंबिवलीकरांनी भारतीय जनता पार्टीवर आणि माझ्यावर आजवर जे प्रेम आणि स्नेह दाखविला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.विधानसभेत बोलताना नेहमी डोंबिवली हि सांकृतिक नगरी आहे असे सांगत सुरुवात केली. त्यामुळे डोंबिवलीबाबत सर्व आमदारांना डोंबिवलीतील वेगळी ओळख झाली आहे.   

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email