अकोल्यातील पोलीस कस्टडीत लैंगिक छळ प्रकरणी सहा पोलीस निलंबित…
अकोला : चोरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांवर मारहाण आणि अश्लील छळ केल्याचे गंभीर आरोप केले होतेय. या प्रकरणामुळे अकोल्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये शक्ती कांबळे या पोलिसाचे आधीच निलंबन झाले होते.
अकोला (Akola) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Police) चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगावमधील सराफा व्यावसायिकाला (Gold Merchants) अटक केली होती. शाम वर्मा अस या पीडित आरोपीचे नाव आहे. शेगावमधून अकोल्यात आणताना गाडीतच आपल्याला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. दरम्यान आरोपीला न्यायालयाने (Court) पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोपही तक्रारकर्त्याने केला होता. दरम्यान कस्टडीमधील आरोपींना पीडित आरोपी समोर आणण्यात आले. यावेळी दोघांना पोलिसांनी पीडित आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावल्याचे गंभीर आरोपही सराफा व्यापारी असलेल्या आरोपीने केले आहेत.
पायावर जास्त मारहाण झाल्याने पायावर व्रण दिसत होते. गरम पाण्याने व्रण मिटावेत म्हणून व्यापाऱ्याच्या पायावर गरम पाणी म्हणून उकळतं पाणी टाकण्यात आलंय. यामुळे व्यापाऱ्याचा पाय गंभीररीत्या भाजला, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान पोलिस अधीक्षकांनी चौकशी समिती नेमली. तर या प्रकरणातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आरोपीच्या नातेवाइकांच्या पाया पडतानाचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला होता. शक्ती कांबळे असे त्या पोलिसांचे नाव आहे.
पीडित सराफा व्यावसायिक हा शेगावचा असल्यामुळे अकोला आणि बुलडाणा पोलिसांच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात दोन समिती बसवण्यात आल्या. या दोन्ही समित्यांचा अहवाल आज मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. परंतु प्राथमिक चौकशीच सराफ व्यावसायिकावर कारवाईसाठी गेलेली पोलीस टीम दोषी आढळल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस शिपाई शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, मोंटी यादव, काटकर आणि चालक पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.