Live News ; शिवसेना मनसे समर्थकांमध्ये राडा

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे आणि मनसेचे उमेदवार राजू पाटील यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी दुपारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाद झाले. हे प्रकरण इतके गंभीर बनले की कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह दोन्ही पक्षांचे उमेदवार रमेश म्हात्रे आणि राजू पाटील यांना मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये यावे लागले. जवळपास २ तास या नेत्यांच्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपसात तडजोड करत मानपाडा पोलिस ठाण्यातून बाहेर आले.

हेही वाचा :- Dombivali ; गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे

पहिली घटना दावडी गावची आहे. जिथे मनसे निवडणूक कार्यालय चालवणारे दीपक भारद्वाज आणि शिवसेना विभाग प्रमुख गुरुनाथ लोटे यांच्यात फटाके वाजवण्यावरून वाद निर्माण झाला होता. दोघांनी ही मानपाडा पोलिस स्टेशन गाठले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसह कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हेही मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये आले.

हेही वाचा :- Dombivali ; जागेवरून फेरीवाले एकमेकांच्या जीवावर उठले फेरीवाल्यावर प्राणघातक हल्ला

भारद्वाज आणि लोटे या दोघांच्या विरोधात पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल करत दोघांना समज देऊन परत पाठविण्यात आले. यासह दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाल्याची घटना बडवली गाव व गांधीनगर येथे घडली असल्याची म्हणून मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दोन्ही पक्षांचे उमेदवार आणि खासदार श्रीकांत शिंदे व कल्याण ग्रामीण यांच्यासह सुमारे अर्धा तास बैठक घेतली. निवडणुकीदरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Video – Live News ; शिवसेना मनसे समर्थकांमध्ये राडा

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email