गुढी पाडव्याला डोंबिवलीत होणार “श्रीराम” नामाचा जप

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२६ – डोंबिवलीतील नवं वर्ष स्वागत यात्रेचे यंदा 21 वर्ष आहे येत्या 6 एप्रिल रोजी होणाऱ्या नवं वर्ष स्वागत यात्रेत ‘राष्ट्रसीमा -माझे योगदान ‘व ‘विश्व शातीच्या दिशेने भारताची वाटचाल ‘या विषयावर चित्ररथ असणार आहेत. यंदा रामजन्मभूमी न्यास व धर्म संसद यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंत प्रत्येक राम भक्ताने “श्रीराम “नाम जप करावा असे आवाहन गणेश मंदिर संस्थान तर्फे करण्यात आले आहे.

शनिवार 6 एप्रिल ते 13 एप्रिल राम नवमी पर्यंतश्रीरामनाम जपयज्ञा ,रामरक्षा पठण ,आयोजित केले असून सांगता 13 ता करण्यात येणार आहे, दरवर्षी गणेश मंदिर संस्थानात दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा 4 तारखेला सायंकाळी 6 वाजता प्रत्येक कुटुंबाने सैनिकांच्या कृतद्न्यतेसाठी एक पणती शिवाजी महाराज उद्यान किंवा विनय कुमार सच्चन स्मारक येथे प्रजवलीत करावी असे आवाहन केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email