नितीन गडकरी उद्या उत्तर प्रदेशातील 90 किलोमीटर लांबीच्या रामजानकी मार्गाचे रुंदीकरण आणि 1224 कोटी रुपयांच्या अन्य राष्ट्रीय महामार्ग योजनांची पायाभरणी करणार
नवी दिल्ली, दि.०८ – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी उद्या उत्तर प्रदेशात 1224 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण आणि सुधारणा कामांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये अयोध्येतील रामजानकी मार्ग ते रामपूर (55 कि.मी.) हा 315 कोटी रुपयांचा आणि रामपूर ते सिकरी गंज या 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. 14 कि.मी. लांबीच्या बस्ती रिंग रोडच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणीही करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग 730 च्या बधनी-शोरतगंज या 35 कि.मी. मार्गाचे रुंदीकरणासाठी 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्गाखेरीज फैजाबाद ते मांझीघाट या 354 कि.मी. लांबीच्या घाघरा नदीच्या (राष्ट्रीय जलमार्ग 40) विकासाची पायाभरणी देखील गडकरी करणार आहेत.
उत्तर प्रदेशातल्या किसान महाविद्यालय, सिव्हील लाईन्स, बस्ती आणि शिवपती पदवी महाविद्यालय हॉस्टेल ग्राऊंड येथे हा कार्यक्रम होणार आहे.