पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना भारतातून हाकलून देण्याच्या भूमिकेवर ठाम का असू नये, असा सवाल करत घुसखोर हा घुसखोरच असतो. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. त्यामुळे यांनी (मनसे) उगाच श्रेय घेऊ नये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला आहे.
हेही वाचा :- कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी उपाययोजना
सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का? असा सवाल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी विचारला.
हेही वाचा :- कोरोना व्हायरस – केरळमध्ये तिसरा रुग्ण आढळला
त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “का ठाम असू नये? घुसखोर हा घुसखोरच असतो. त्यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित नाही करता येणार. मुळात घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे. यांनी उगाच श्रेय घेऊ नये. ती बाळासाहेबांनी आधीच ठामपणे मांडली आहे. ही नवीन भूमिका नाही. पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलावं लागेल. कोणी अडवलंय तुम्हाला?”
हेही वाचा :- कोरोना विषाणू संदर्भात प्रवासविषयक सुधारित सूचना जारी
याचबरोबर, उद्धव ठाकरे म्हणाले, “उदाहरण देतो. मध्यंतरी ‘लोकसत्ता’ने एक अग्रलेख लिहिला होता निश्चलनीकरणाबाबत. निश्चलनीकरणाच्या निर्णयाचे एक कारण सांगितलं गेलं होतं त्या वेळी…ते होतं खोटय़ा नोटांचं. संपूर्ण अर्थव्यवस्थेत किती टक्के खोटय़ा नोटा होत्या? काही टक्क्यांत असतील. पण त्या काही टक्क्यांसाठी तुम्ही संपूर्ण चलनी नोटांचे कागदाचे तुकडे केलेत, तसे काही टक्के घुसखोरांसाठी संपूर्ण देशाला रांगेत उभं करताय. मला असं वाटतं, या सरकारचं एक विचित्र धोरण आहे…सतत तुम्हाला टेन्शनखाली ठेवायचं.”
Hits: 0