अधिकाऱ्यांची कमतरता
नवी दिल्ली, दि.०१ – सशस्त्र दलांमध्ये आज घडीला अधिकृत क्षमतेच्या तुलनेत अधिकाऱ्यांची कमतरता भासत आहे. १ ऑगस्ट २०१८ रोजी लष्कराची अधिकृत क्षमता ४९,९३३ असून त्यापैकी ४२,६३५ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत तर ७२९८ पदे रिक्त आहेत. नौदलाची अधिकृत क्षमता ११,३५२ असून त्यापैकी ९७४६ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत तर १६०६ पदे रिक्त आहेत. वायू सेनेत अधिकृत क्षमता १२,५८४ असून त्यापैकी १२,३९२ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत तर १९२ पदे रिक्त आहेत.
सशस्त्र दलांमध्ये पदभरती ही निरंतर प्रक्रिया आहे. अधिकाऱ्यांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच युवा वर्गाला सशस्त्र दलांकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
Please follow and like us: