शूटिंग रेंज, फिश मार्केट, सेल्फी पॉइंट, बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण, सिटी पार्कचे भूमिपूजन

(श्रीराम कांदु)
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याण, अंबरनाथमध्ये विकासकामांचा धडाका

ठाणे – शिवसेनेने कल्याणकरांना वचन दिलेल्या भव्य अशा सिटी पार्कचे भूमिपूजन मंगळवारी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याण येथे झाले. त्याचप्रमाणे अंबरनाथ येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शूटिंग रेंजचे, तसेच फिश मार्केट, सेल्फी पॉइंट, बहुउद्देशीय सभागृह, व्यायामशाळा आदी विकासकामांचे लोकार्पणही श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत आणि दीपाली देशपांडे शिरसाट उपस्थित होत्या. महाराष्ट्रात काही ठिकाणी १० मीटरचेच शूटिंग रेंज उपलब्ध आहेत. जागतिक शूटिंग स्पर्धांमध्ये खेळाडूंना भाग घेण्यासाठी आवश्यक असलेली २५ व ५० मी.ची रेंज फक्त मुंबईत वरळी येथे उपलब्ध आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापुर, उल्हासनगर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडूंना सरावासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागत होता.

हेही वाचा :- अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का त्यावर आदित्य ठाकरें म्हणाले…

अनेक खेळाडूंना आर्थिक परिस्थितीमुळे मुंबईपर्यंत जाणे शक्य नव्हते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंची ही अडचण ओळखून अंबरनाथ शहरात जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज व्हावे, यासाठी सन २०१५ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच, खासदार निधीही देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचेच फलित म्हणून विम्को नाका, अंबरनाथ पश्चिम येथील नगर परिषदेच्या सुमारे सव्वा एकर जागेवर १० मी., २५ मी. व ५० मी.चे जागतिक दर्जाचे शूटिंग रेंज आकाराला आले आहे. सुमारे अडिच कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले असून खासदार निधी, डॉ. बालाजी किणिकर यांचा आमदार निधी आणि अंबरनाथ नगर परिषदेचा निधी यांद्वारे हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. कल्याण (प.) येथील सिटी पार्क हा शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वचननाम्यातही या प्रकल्पाचा समावेश होता.

हेही वाचा :- अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का त्यावर आदित्य ठाकरें म्हणाले…

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका स्तरावर वारंवार बैठका घेऊन या प्रकल्पातील अडचणी दूर केल्या असून मंगळवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तब्बल ३० एकरावर हा प्रकल्प दोन टप्प्यांत साकारत असून पहिल्या टप्प्यात सुमारे ६४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याप्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार महापौर विनिता राणे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणिकर, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, अंबरनाथच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email