धक्कादायक! वॉशरुममध्ये महिला सहकाऱ्याचे रेकॉर्डिंग करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबलने लपवला मोबाइल

बँकेच्या प्रसाधनगृहात महिला सहकाऱ्याचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी एका २९ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली होती. अनिकेत परब असे आरोपीचे नाव असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी वरळी पोलीस लाईनमध्ये राहतो. अटक केल्यानंतर अनिकेतचे निलंबन करण्यात आल अनिकेत परबला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. नंतर त्याला जामीन मंजूर झाला. आरोपीला वांद्रयातील हिल रोडवरील सरकारी बँकेमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. तक्रारदार महिला तीन दिवसांपूर्वीच तिथे आली होती. बुधवारी पावणेपाचच्या सुमारास कामावर रिपोर्ट केल्यानंतर तक्रारदार महिला पोलीस कपडे बदलण्यासाठी रेस्ट रुममध्ये गेली. अनिकेत परब तिथे आधीपासूनच होता.

तिने त्याला तिथून बाहेर जाण्यास सांगितले. आरोपी बाहेर गेल्यानंतर कपडे बदलत असताना तिचे लपवून ठेवलेल्या मोबाइल फोनवर लक्ष गेले. फोनचा कॅमेरा महिलेच्या दिशेने होता. फोन नजरेस पडू नये यासाठी त्यावर रुमाल घातलेला होता. फोन हातात घेतला तेव्हा व्हिडीओ मोड ऑन होता. तक्रारदार महिला खाली गेली व तिने परबला या कृत्याचा जाब विचारला. तेव्हा त्याने फोन तिच्या हातातून हिसकावून घेतला व माझ्या फोनला हात लावण्याची तू हिम्मत कशी केलीस ? असा प्रश्न तिला विचारला. परब नंतर वॉशरुममध्ये पळाला. तिथून बाहेर आल्यानंतर त्याने तिला आपला फोन दाखवला व काहीही रेकॉर्ड केले नाहीय असा दावा केला. आरोपीने व्हिडिलो डिलीट केल्याचा मला संशय आहे. मी माझ्या वरिष्ठांना याबद्दल सांगितले. पोलीस उपायुक्त बँकेत आले. त्यांनी संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला तात्काळ एफआयआर नोंदवण्यास सांगितले अशी माहिती तक्रारदार महिलेने दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email