धक्कादायक! तरुणावर सामूहिक बलात्कार
नवी मुंबई दि.२९ – वाशीतील सागर विहार परिसरातून तरुणाचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला आहे. लैंगिक अत्याचारानंतर सुमारे अर्धा तास पीडित तरुणास अज्ञात आरोपी मारहाण करत होते. वेळीच उपचार मिळाल्याने पीडित तरुणाचे प्राण वाचले आहेत.
हेही वाचा :- Kalyan ; सात वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार
पीडित तरुण सोमवारी संध्याकाळी वाशीतल्या जागृतेश्वर मंदिराजवळ फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याचं अपहरण केले. त्यानंतर लैंगिक अत्याचार केला. सुरुवातीला तरुण बेशुद्ध पडला होता. शुद्धीवर आल्यानंतर तो रुग्णालयात दाखल झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Please follow and like us: