Live News ; ‘साहेब आता तुम्हीच व्हा मुख्यमंत्री’, विजयी आमदारांची आदित्य ठाकरेंना साद
मुंबई दि.२६ – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील विजयी आमदारांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मात्र आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करावं असा सूर विजयी आमदारांमध्ये उमटला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शिवसेनेत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी दबाव वाढू लागला आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये त्यात वाघाच्या हाती कमळ दाखवण्यात आलंय. तसंच वाघाच्या गळ्यात घड्याळही दिसतं आहे.
हेही वाचा – हेही वाचा :- फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची चिमूकल्यानी घेतली शपथ….
व्यंगचित्रकाराची कमाल…बुरा न मानो दिवाली है असं कॅप्शनही राऊतांनी दिलं आहे. दुसरीकडे बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेनं विजयी बंडखोर आणि अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यात शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेना बंडखोर आमदार आशिष जयस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघातील बंडखोर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
हेही वाचा – व्यवसाय सुलभीकरणात भारताची झेप, जागतिक यादीत 77 व्या स्थानावरून 63 स्थानावर
शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जातं आहे. त्यामुळेच वरळीतून जिंकून आल्यानंतर शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचं वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन काल अशा आशयाचे बॅनर्स वरळीत लावले होते. तर आज प्रभादेवी परिसरात आता यंग सोच विन्स अशा आशयाचे पोस्टर्स लागल्याचं पहायला मिळतं आहे.