हवाई दलाच्या थोईसे तळाकडून चादर ट्रेक मोहीम
नवी दिल्ली, दि.१५ – 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने थोईसे हवाईदल तळाने लडाखच्या दुर्गम भागात ट्रेकिंग मोहीम आयोजित केली होती. बर्फामुळे गोठलेल्या झंस्कार नदीवर हवाई दलाच्या योद्ध्यांची ही मोहीम पार पाडली. विंग कमांडर विक्रांत उनियाल यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. यात हवाई दलाचे सात सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी 5 दिवसांत 65 कि.मी. अंतर पार केले. चादर ट्रेक हा देशातला अतिशय खडतर ट्रेक आहे. या ट्रेक दरम्यान या पथकाने पाण्यात पडलेल्या अन्य एका ट्रेकरचा जीव वाचवला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हवाई दलाच्या सदस्यांनी ही मोहीम पूर्ण केली.
Please follow and like us: