शरद पवार यांच्या हस्ते टाटा मोटर्सचे दिमाखदार उद्घघाटन
Hits: 0
ठाणे दि.२९ :- हेरीटेज मोटर्स अर्थात टाटा मोटर्स या वाहन विक्रीच्या शोरुमचे शरद पवार यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. पाचपाखाडी येथे संतोष तिवारी आणि सुरेंद्र उपाध्याय यांच्या मालकीचे हेरीटेज मोटर्स हे वाहन विक्रीचे शो रुम आहे. या शोरुमला आता टाटा मोटर्सचा अधिकृत परवाना मिळाला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा :- पर्सनल गोष्टि सोशल मिडियावर टाकू नका.
यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, आ. रवींद्र फाटक, महापौर नरेश म्हस्के, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, गुलाबराव जगताप, अमित सरय्या आदी मान्यवर उपस्थित होते. वाहने विक्रीचा व्यवसाय करीत असतानाच महाराष्ट्राची प्रगती वेगवान होईल, या पद्धतीने काम करा, असा सल्ला यावेळी शरद पवार यांनी तिवारी आणि उपाध्याय यांना दिला.
हेही वाचा :- पोषण अभियानांतर्गत पालक मेळावा संपन्न