ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव कुलकर्णी यांचे निधन

Hits: 0

डोंबिवली दि.३१ :- मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव कुलकर्णी यांचे शुक्रवारी दुपारी १ वाजता डोंबिवलीत वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ९१वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शिव मंदिराजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती.
पत्रकारांना शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. नवाकाळमध्ये त्यांनी अनेक वर्षे बातमीदार म्हणून वृत्तसंकलनासाठी काम केले होते. आध्यत्मिक विषयांवर लिखाण करण्याची त्यांना विशेष आवड होती. डोंबिवलीतील अनेक सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे ते पदाधिकारी होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी गोपाळराव कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अत्यंत व्यासंगी, अभ्यासू आणि शिस्तप्रिय असे गोपाळरावांचे व्यिक्तमत्त्व होते.
त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकांमध्ये अनेक वर्षे सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून मोलाचे काम केले. सदैव हसतमुख असणारे गोपाळराव अत्यंत मृदू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने आपण एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला असल्याचे वाबळे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published.