आलिशान कारमधुन ७० बिअरचे कॅन जप्त
भोसरी – आलिशान कारमधून बिअर नेणाऱ्या तिघांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तिघांकडू बिअरचे ७० कॅन जप्त केले. ही कारवाई दापोडी येथील ११ नंबर बस स्टॉप जवळ करण्यात आली आहे.
लुकमान हरून नदाफ (वय २९), लुकमान नदाफ याचा भाऊ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही, दोघे रा. दापोडी), केतन शितोळे (रा. सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस शिपाई रवींद्र जाधव यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास आरोपी फोर्ड एन्डोवर (एम एच 14 / ए एफ 2000) या आलिशान कारमधून आरोपी लुकमान आणि त्याचा भाऊ बिअरचे ७० टिन विक्रीसाठी घेऊन जात होते. आरोपी केतन याच्याकडून त्यांनी हा मद्यासाठा आणला होता.
भोसरी पोलिसांनी तिघांवर कारवाई करत ९ हजार ८०० रुपयांची दारू जप्त केली.तिघांना पोलिसांनी समजपत्र देऊन सोडून दिले आहे.
भोसरी पोलीस तपास करीत आहेत.