ठामपा सुरक्षा अधिकाऱ्याची दारू पिऊन सुरक्षाचे कर्तव्य
ठाणे दि.११ :- महानगरपालिका सहाय्यक सुरक्षा अधिकारी धनश्याम फर्डे नावाचे अधिकारी ऑन ड्युटी असताना दारू पिऊन कर्तव्य बजावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पदाचा गैरवापर करत हे अधिकारी कनिष्ठ सुरक्षा रक्षकांकडून कारवाईची धमकी देऊन पैशाची मागणी करत असल्याचा प्रकारही घडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. फर्डे हे ठाणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागात सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
हेही वाचा :- उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईनद्वारे वीजबील भरताना खबरदारी घ्यावी : महावितरणचे आवाहन
काही दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर बढती झाली आहे. सुरक्ष रक्षकांनावर नजर ठेवण्याच्या नावे फर्डे रात्री गस्तीवर असतात. विनाकारण सुरक्षा रक्षकांना दमदाटी करतात. दुरुच्या नशेत उलटसुलट बोलतात. तसेच त्यांना विनाकारण मेमो देण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात. असा आरोप काही सुरक्षा राक्षकांकडून करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच ते मुंब्रा येथील स्टेडियम मध्ये रात्रीच्या वेळेत जाऊन तेथील सुरक्षा रक्षक कार्यालयात दारू पीत बसले होते. याबाबतचा व्हिडीओ प्रसार माध्यमांच्या हाती आला आहे. त्यामध्ये ते सुरक्षा रक्षकासोबत बोलत असून दारु पीत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून होत आहे. फर्डे यांच्या वागण्याबाबत पालिकेच्या सुरक्षा प्रमुखांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या असूनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे अनेक सुरक्षा रक्षकांनी सांगितले