मुद्रा लोणच्या माध्यमातून लाखोंचा चूना दुकलीचा शोध सुरू

डोंबिवली दि.१९ :- प्रतिनिधी बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेनंतर्गत बेरोजगारांना व्यवसायासाठी शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र काहो संधीसाधू बनावट कागदपत्र सादर करत पैसे लाटण्याचा प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवून पैसे लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कल्याणात दोघा जणांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजेश सिंग व भारती भांगरे अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा :- डोंबिवलीत आज भव्य डॉगशो

भिवंडीतील चांगो नगरमध्ये प्रवीण शेठ चाळीत राहणारा राजेश सिंग या तरुणाने ऑगस्ट 2016 रोजी कल्याणच्या खडकपाडा येथील बँकेत बनावट कागदपत्रे सादर करत केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत राज फेब्रिक्स अँड टेक्स्टाइल्स नावाने धागे बनवण्याच्या व्यवसायाच्या नावाने 10 लाखांचे कर्ज घेतले. मात्र परतावा न करता हे पैसे लाटले व राजेश सिंग पसार झाला. अशीच आणखी एक घटना उघडकीस आली.

हेही वाचा :- बापू नाडकर्णी यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली क्रिकेटला लोकप्रियतेचे वलय देणारा महान खेळाडू गमावला : अजित पवार

भिवंडी-आग्रा रोडला जनता कंपाऊंडच्या नवकार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या भारती भांगरे या महिलेने ऑगस्ट 2016 रोजी याच बँकेत वैष्णवी ब्युटी पार्लर व्यवसायाच्या नावाने खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून 2 लाख रुपये कर्ज काढले. मात्र पैशांची परतफेड न करता भारती भांगरे  पसार झाली. या दोन्ही प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात शासनाच्या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम लाटत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भारती भांगरे व राजेश सिंग या दोघा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email