मुंबईतल्या इएसआयसी रुग्णालय आगीत 10 जणांचे प्राण वाचविणाऱ्या सिद्धरामेश्वर यांना एक लाख रुपयांचे बक्षिस
नवी दिल्ली, दि.०१- मुंबईतल्या अंधेरी येथील इएसआयसी रुग्णालयाला लागलेल्या आगीत अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्यासाठी मदत करत 10 जणांचे प्राण वाचवणाऱ्या सिद्धरामेश्वर सिद्धराम हुमनाबडे या फुड डिलिव्हरी बॉयला, केंद्रीय कामगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी एक लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे.
हेही वाचा :- कृषी निर्यात विभाग
सिद्धरामेश्वर यांचे धैर्य, नि:स्वार्थी स्वभाव प्रशंसनीय आहे. इएसआयसीचे कर्मचारी नसतानाही आपल्या नि:स्वार्थी वृत्तीने, कठीण प्रसंगात सिद्धरामेश्वर यांनी केलेले कार्य आदर्श आहे असे प्रशंसोद्गार गंगावार यांनी काढले आहेत.
Please follow and like us: