स्वातंत्र्य दिनानिमित्त सलमान खानने चाहत्‍यांना एक खास गिफ्‍ट

मुंबई दि.१५ – स्वातंत्र्य दिनानिमित्त सलमान खानने चाहत्‍यांना एक खास गिफ्‍ट दिलं आहे. सलमानने ‘भारत’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सलमान खानचा चित्रपट ‘भारत’ पहिल्‍यापासूनच चर्चेत राहिला आहे. सलमान खानच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. या टीझरमध्ये सलमान खानने कोणताही चित्रपटाचा भाग दाखवलेला नसून फक्‍त आवाज ऐकू येतो. सलमान टीझरमध्‍ये म्‍हणतो की, ‘काही नाती जमीनीशी असतात. आणि काही रक्‍ताची. माझ्‍याकडे दोन्‍ही आहेत’.

भारतमध्‍ये सलमानसोबत कॅटरीना कैफ मुख्‍य भूमिकेत आहे. तसेच दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहेत. हा चित्रपट अली अब्बास जफर दिग्‍दर्शित करत आहेत. हा चित्रपट २०१४ मध्‍ये आलेला कोरियन चित्रपट ऑड टू माय फादरचा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून पुढील शूटिंग माल्टामध्‍ये होणार आहे. सलमान सध्‍या ‘दस का दम’ या टीव्‍ही शोचे होस्ट करत आहे. आता लवकरच तो बिग बॉस १२ मध्‍येही दिसेल. सलमान सध्‍या माल्‍टामध्‍ये आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email