साहेब, आम्ही हे ही पाहिलाय…
(शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरुण साभार)
१२ मार्च १९९३- मुस्लिम वस्तीत बॉम्ब स्फोट झालेला नसताना तो झाला असे खोटे ठोकून दिलेले मी पाहिलंय. सुधाकरराव नाईक हे भाई ठाकूर, पप्पु कलानी यांच्या विरोधात कारवाई करत होते तेव्हा तुम्हाला कळवळा आलेला आम्ही पाहिला आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण तुम्ही कसे केले ते ही आम्ही पाहिलाय. दाऊदच्या गुंडानी तुमच्या विमानातून कसा प्रवास केला तो ही पाहिलाय. ‘लवासा’ कसे झाले ते ही सगळ्यांनी पाहिलाय. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुमच्या ‘ब्लु आईड बॉय’ ने काय काय वक्तव्य केली आणि तुम्ही गप्प कसे बसलात ते ही पाहिलाय.
हेही वाचा :- नारायण राणे म्हणतात ‘नो होल्ड्स बार्ड…’
स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेत सर्वात जातीय राजकारण कसे केलेत ते सुद्धा पाहिलाय. चंद्राबाबू, ममता, जयललिता यांनी स्वत:च्या ताकदीवर आपापल्या राज्यात स्वबळावर सत्ता आणली, तुम्हाला मात्र महाराष्ट्रात ते आजवर कधीही जमले नाही हे ही आम्ही पाहिलाय. नावात राष्ट्रवादी असलेला तुमचा पक्ष आता फक्त महाराष्ट्रवादी कसा होत चाललाय ते ही आम्ही पाहिलाय. तुम्ही केंद्रीय कृषिमंत्री असतांनाच सर्वात जास्त शेतक-यांनी आत्महत्या कशा केल्या ते ही आम्ही पाहिलाय. आणि इतरांना नेहमी कात्रजचा घाट दाखविणारे तुम्ही अंगाला तेल लावलेल्या पैलवानासारखे सगळ्यातून नेहमीच कसे निसटता हे ही आम्ही पाहिलाय आणि पाहतो।