आरटीओ कल्याणचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात
Hits: 0
(मुंबई आसपास ब्युरो )
येत्या २१ तारखेला राज्य विधानसभेच्या २८८ मतदार संघा साठी निवडणुका आहेत . ह्या करीता सर्व शासकीय आणि निम साशकीये विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचारीगण ह्यांची सेवा घेतली जाते. त्याच प्रमाणे कल्याण उप प्रादेशिक कार्यालयाच्या अधिकारी तसेच कर्मचारी गण ह्यांना सुद्धा निवडणुकीच्या कामात गुंतविले गेले आहे . त्यामुळे परिवहन कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी परिवहन विभागाच्या काम करून निवडणुकी साठी सुद्धा काम करीत आहेत .
अशावेळेत एक खिडकी योजनेची सेवे वर परिणाम होणे शक्य आहे . परिवहन खात्याच्या वतीने नागरिकांनां काही दिवसासाठी सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे . काही लोकांचे वाहन प्रमाणपत्र किंवा दुसरे काम असतील तर ते हळू का होई ना पण पूर्ण करून दिले जातील. असे आव्हान उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण संजय ससाणे ह्यांच्या मार्फत करण्यात आले आहे